मनसेने भागविली ग्रामस्थांची तहान

। नेरळ । वार्ताहर ।
कर्जत तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत उमरोली हद्दीतील आषाणे गावात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे ग्रामस्थांनी पाण्याची समस्या बोलून दाखवली होती. त्यावेळी मनसे रायगड जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील बोअरवेल खोदून देऊन पाण्याचा प्रश्‍न निकाली काढण्याचा शब्द दिला होता. तो शब्द मनसेच्या कार्यकर्त्यांनी पूर्ण केला असून, आषाणे गावात आता पाण्याच्या टाकीवर महिला पिण्याचे पाणी भरू शकणार आहेत.
या कामाला मनसे शाखा आषाणे सर्व पदाधिकारी यांनी देखील आर्थिक हातभार लावून ते काम पूर्णत्वास नेले. समीर कर्णुक यांनी सिंटेक्स टाकी साठी आर्थिक मदत केली.त्यामुळे दोन हजार लिटर क्षमता असलेली पाण्याची टाकी बसवून पाणी सर्वांसाठी खुले करण्यात आले. त्या पाण्याचा वापर ग्रामस्थांनी मनसेचे कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत केला.
आषाणे गावातील ग्रामस्थांनी जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील, उपविभाग अध्यक्ष मनोज ठाणगे आणि मनसे शाखा आषाणे यांचे आभार मानले आहेत. त्यावेळी विभाग अध्यक्ष तेजस तुपे, उपविभाग अध्यक्ष मनोज ठाणगे, शाखा अध्यक्ष आशिष ठाणगे, कृष्णा श्रीखंडे, अजित श्रीखंडे, सचिन गायकर, जितेंद्र रूठे, पंकज बुंधाटे, प्रफुल्ल ठाणगे, रोशन जाधव, सोमनाथ ठाणगे,राकेश ठाणगे, प्रशांत ठाणगे, अविनाश ठाणगे, तुषार ठाणगे आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

Exit mobile version