नेरळमध्ये मनसेचे रस्ता रोको आंदोलन

नेरळमध्ये मनसेचे रस्ता रोको आंदोलन
रस्त्याच्या दुरवस्थेबाबत बांधकाम विभागाचा निषेध
। नेरळ । वार्ताहर ।
कर्जत तालुक्यतील नेरळ-कळंब या महत्वाच्या रस्त्याच्या दुरवस्थे बाबत अनेकवेळा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पत्रव्यवहार करून हा रस्ता चांगल्या दर्जाचा करावा अशी मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली होती. परंतु अनेक दिवस उलटूनही रस्त्याची साधी डागडुजी देखील करण्यात आली नसल्याने मनसेने गुरुवारी (दि.25) सकाळी 10 वाजता नेरळ -कळंब या रस्त्यावरील साई मंदिर येथे बेधडक रस्ता रोको आंदोलन सुरू केले आहे. यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत बांधकाम विभागाचा निषेध नोंदवला
या आंदोलनात सरकारमध्ये सामील असलेल्या लोकप्रतिनिधीचा निषेध, नेरळ- कळंब रस्ता झालाच पाहीजे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे करायचे काय खाली डोकं वरती पाय अशा घोषणा देत निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी मनसे रायगड जिल्ह्याध्यक्ष जितेंद्र पाटील, राजू मरे, तालुका अध्यक्ष महेंद्र निगुडकर, उप तालुकाध्यक्ष यशवंत भवारे, अकबर देशमुख, सतीश कालेकर, मंगेश गोमारे, सतीश जाधव आदी आंदोलनात सामील झाले होते. तीन तासांनंतर बांधकाम विभागाचे प्रभारी अभियंता चौधरी यांनी पोलिसांच्या माध्यमातून लेखी आश्‍वासन दिल्यानंतर हे आंदोलन स्थगित करणायत आले.

Exit mobile version