मनसेचे कल्याण ग्रामीणमध्ये शक्ती प्रदर्शन

| डोंबिवली | प्रतिनिधी |

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती व महाविकास आघाडीतील पक्षांची मोर्चेबांधणी व प्रचारास सुरवात झाली आहे. मनसेने अद्याप आपली भूमिका स्पष्ट केली नसून पाडव्याला मनसे अध्यक्ष ती जाहीर करणार आहेत. त्या अगोदर कल्याण ग्रामीण व डोंबिवलीत रविवारी मनसेच्या वतीने नवचैतन्य रॅली काढत एक प्रकारे शक्ती प्रदर्शन केले. मनसेचे हे शक्तिप्रदर्शन नेमके काय दर्शवते? कल्याण लोकसभेत उमेदवार देणार का अशी चर्चा आता रंगू लागली आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने डोंबिवली आणि कल्याण ग्रामीण मध्ये नवचैतन्य रॅलीचे आयोजन रविवारी करण्यात आले होते. सदर रॅलीत मोठ्या संख्येने महाराष्ट्र निर्माण सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते. लोकसभा निवडणुकीच्या तारखा या जाहीर झाल्या असून सर्वच राजकीय पक्ष आपल्या पक्षाची मोर्चे बांधणी करत आहे. नवचैतन्य बाईक रॅलीतून एक प्रकारे कल्याण लोकसभेत मनसे तर्फे शक्ती प्रदर्शन करण्यात आले.

मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा उत्साह पाहता पाडव्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरे आपली भूमिका मांडताना लोकसभा निवडणूक लढवणे व उमेदवारांची घोषणा करणार का ? कल्याण च्या जागेवर मनसे दावा करणार का अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.

Exit mobile version