वाहतूक कोंडी विरोधात मनसे उतरणार रस्त्यावर

| उरण  | वार्ताहर |
खोपटा पूल ते कोप्रोली रस्त्या लगत उभारण्यात आलेल्या कंटेनर यार्ड मुळे विद्यार्थी आणि नोकरदार वर्गाला तीन ते चार तास दररोज वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.याची दखल  घेत  मनसेचे जिल्हाध्यक्ष संदेश ठाकूर  यांच्या नेतृत्वाखाली  उरण वाहतूक पोलीस विभागाचे वरिष्ठ पोलीस अधिकारी अशोक गायकवाड यांना सदर वाहतूक कोंडाचा तिढा सोडवण्यासाठी निवेदन देण्यात आले आहे.
 वाहतूक कोंडीची समस्या न सुटल्यास मनसे टाईलने रस्त्यावर उतरून आंदोलन उभारण्यात येणार असा  इशारा मनसेकडून देण्यात आला आहे. यावेळी सत्यवान भगत,  धनंजय भोरे,   राकेश भोईर, रितेश पाटील,दीपक पाटील,  गणेश तांडेल,अल्पेश कडू, बबन ठाकूर, सुरेश अय्यर,हितेश साळुंखे,सुरज माळी,अमर ठाकूर, आकाश ठाकूर सह मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Exit mobile version