| रसायनी | वार्ताहर |
शिवसेना ठाकरे गटाचे माजी आ. मनोहर भोईर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून सोनारी येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी शाखा अध्यक्ष सुरेश चंद्रकांत कडू व माजी शाखा खजिनदार अमर हरीचंद्र पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह मंगळवारी (दि. 30) शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. यावेळी माजी आ. मनोहर भोईर यांनी सुरेश चंद्रकांत कडू व अमर पाटील यांना शिवबंधन बांधून त्यांचे शिवसेनेमध्ये स्वागत केले. यावेळी माजी सरपंच रोहिदास मोरेश्वर पाटील, माजी उपसरपंच मेघशाम नारायण कडू, माजी शाखाप्रमुख हरीचंद्र महादेव कडू, शाखाप्रमुख दिनेश वासुदेव पाटील, किशोर धर्मराज कडू, किशोर नारायण कडू, रमाकांत बाळाराम कडू, विराज सुरेश कडू, किशोर आत्माराम कडू, हितेश राजेश म्हात्रे, सुचित मेघशाम कडू तसेच उपतालुका संघटक कृष्णा घरत, केगाव कमकालर तांबोळी, डोंगरी सचिन पाटील, अनंत घरत आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.