| पनवेल | प्रतिनिधी |
ढाब्यावर जेवण करण्यासाठी गेले असता, मोबाइल चोरीला गेल्याची घटना कामोठे येथे घडली. याप्रकरणी कामोठे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. विवेक गुरव हे खारघर येथे राहत असून, ते आणि त्यांचा मित्र अजय पार्ले हे म्हात्रे ढाबा, स्मशानभूमी जवळ, कामोठे याठिकाणी जेवण करण्यासाठी गेले होते. त्यांनी मोबाइल हॉटेलमधील टेबलवर ठेवला होता. जेवण केल्यावर हात धुण्यासाठी गेले, तितक्या वेळात त्यांचा मोबाइल गायब झाल्याचे लक्षात आले.
ढाब्यावर जेवताना मोबाईलची चोरी

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606