कर्जत तालुक्यातील गुंडगे येथील घटना
कर्जत । वार्ताहर ।
कर्जत पोलीस ठाणे हद्दीत दिनांक 02 जुलै रोजी पहाटे चारच्या सुमारास फिर्यादी आपल्या घरात झोपले होते. त्यावेळी अनोळखी इसमाने गुंडगे ता. कर्जत येथील फिर्यादीच्या घराच्या दरवाजाची आतून बंद असलेली कडी बाहेरून आतमध्ये हात घालुन दरवाजाची कडी उघडुन आत प्रवेश करून फिर्यादीने आपल्या उशाला ठेवलेला 15 हजाररुपये किंमतीचा ओपो कंपनीचा ए-9 मॉडेलचा मोबाईल तसेच फिर्यादी यांच्या भावाचा चार्जिंगला लावलेला मोबाईल लांबवून घेवून पळून गेला. यासंदर्भात दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करुन सदर आरोपीस गुन्हा घडलयचूंरत अवघ्या 16 तासातच कर्जत पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत कर्जत पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 196/2021, भा.दं.वि.क 380, 457 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक श्री.गावडे हे करीत आहेत.