मोबाईल चोरणारा अटकेत

। पनवेल । वार्ताहर ।
प्रवाशाचा मोबाईल फोन जबरीने खेचून पळून जाणार्‍या मोहम्मद अश्फाक जाफर अली अन्सारी नावाच्या गोवंडी येथे राहणार्‍या आरोपीस वाशी रेल्वे पोलिसांनी पाठलाग करून रंगेहाथ पकडले आहे. पनवेल तालुक्यातील उसर्लीगाव येथे राहणारा नवनाथ पोस्तूरे हा तरुण कुर्ला ते पनवेल असा लोकलने प्रवास करत होता. सदरची लोकलगाडी गोवंडी रेल्वे स्थानकात आली असता, ट्रेनमध्ये चढलेल्या मोहम्मद अन्सारी याने नवनाथ पोस्तुरे यांच्या हातातील मोबाईल फोन जबरदस्तीने खेचून तो पळून जाऊ लागला. त्यावेळी स्थानकात ड्युटीवर असलेले पोलीस अंमलदार काकडे यांनी त्यास प्रवाशांच्या मदतीने पाठलाग करून पकडले. याबाबत अन्सारी याच्याविरोधात वाशी रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक केली असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णु केसरकर यांनी दिली.

Exit mobile version