मोबाईल चोर पोलिसांच्या तावडीत

। पनवेल । वार्ताहर ।
कामोठे येथील एका इसमाचा मोबाईल चोरणार्‍या सराईत मोबाईल चोरट्यास फलाटावरील प्रवाशांनी पकडून त्यास पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. कामोठे येथे राहणार्‍या स्वप्नील जाधव यांच्यासोबत हा प्रकार घडला आहे. तो नेरुळ येथे बहिणीकडे आला असता तिथून रेल्वेने मुंबईला चालला होता. यावेळी तो नेरुळ स्थानकात मुंबईकडे जाणार्‍या लोकलमध्ये दरवाजात उभा होता. लोकल सुरु होताच एका तरुणाने त्याच्या हातातील मोबाईल हिसकावून पळ काढला. यावेळी जाधव याने आरडाओरडा करताच नागरिकांनी चोरट्याला पकडून रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिले. त्याचे नाव इम्रान मोहम्मद आझाद शेरानी (28) असे असून, पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Exit mobile version