। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मोदी20 हे जीवनचरीत्र लवकरच प्रकाशित होणार आहे. पुस्तकाचे प्रकाशक रुपा पब्लिकेशन्स यांनी ट्वीटद्वारे ही माहिती दिली. हे पुस्तक या वर्षातील सर्वात महत्त्वाचे पुस्तक असणार. एप्रिल 2022 मध्ये हे नवीन मोदीचरित्र बाजारात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले. मोदी यांच्या कारकिर्दीला 20 वर्षे झाल्यानिमित्त हे पुस्तक प्रकाशित केले जाणार आहे. या पुस्तकात गानसमाज्ञी लता मंगेशकर, गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय सल्लागार अजित डोवाल, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, अभिनेते अनुपम खेर, बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू आदींनी मोदींच्या व्यक्तिमत्त्वाबाबत केलेले विशेष लेखन या पुस्तकात वाचायला मिळणार आहे.