पराभवाच्या भीतीमुळे मोदी थरथरताहेत- राहुल गांधी

India's Congress party leader Rahul Gandhi addresses a press conference at the Congress party headquarters in New Delhi on March 21, 2024. (Photo by Arun SANKAR / AFP) (Photo by ARUN SANKAR/AFP via Getty Images)

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

पंतप्रधान नरेंद्र मोदी पराभवाच्या भीतीमुळे थरथरत आहे, म्हणून ते एकापाठोपाठ एक खोटं बोलत आहेत, असा हल्लाबोल काँग्रेसचे नेते राहुल गांधीं यांनी नरेंद्र मोदींवर केला आहे.

राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ट्विट केलं असून, एक व्हिडीओदेखील शेअर केला आहे. पराभवाच्या भीतीने नरेंद्र मोदी थरथरत आहेत. त्यामुळेच ते एकापाठोपाठ एक खोटं बोलत आहेत. नरेंद्र मोदी गरिबांचे नव्हे तर, अब्जाधीशांचे नेते आहेत, हे भारतातील जनतेला समजलं आहे, हे त्यांनाही माहीत आहे. भारतातील जनता संविधानाच्या रक्षणासाठी उभी राहिली आहे, हे त्यांना माहीत आहे. निवडणूक त्यांच्या हाताबाहेर गेली आहे हे त्यांना माहीत आहे. निवडणूक रोख्यांमध्ये एवढी चोरी झाली आहे की निवडणुकीनंतर ते अडचणीत येतील. देशाच्या एक्स-रेबद्दल बोलताच नरेंद्र मोदी थरथरायला लागले. भीती वाटताच ते खोटं बोलायला लागतात, ही त्यांची सवय आहे. ते कधी पाकिस्तानबद्दल बोलतील तर कधी चीनबद्दल. त्यामुळे एकामागून एक खोटं बोललं जात आहे. पण यावेळी बाहेर पडू शकणार नाहीत, असं म्हणत राहुल गांधी यांनी मोदींवर हल्लाबोल केला आहे.

जातनिहाय जनगणना हा आपला संकल्प असून, तो पूर्ण करणार आहे. या मार्गात कोणीही अडथळा बनू शकत नाही, कारण हे त्यांचे राजकारण नसून लक्ष्य आहे. ओबीसी समाज विचारत आहे की राम मंदिर बांधले, पीएम मोदी हे अनुष्ठानात सहभागी झाले, पण त्यात ओबीसी समाजाचा सहभाग का नाही? असंदेखील राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

Exit mobile version