। लंडन । वृत्तसंस्था ।
इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू मोईन अलीने सर्वप्रकारच्या क्रिकेटमधून अचानक निवृत्तीची घोषणा केली आहे. मोईन अलीने म्हटले आहे की, मी आता 37 वर्षांचा आहे आणि या महिन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार्या मालिकांसाठी माझी इंग्लंड संघात निवड झालेली नाही. मी इंग्लंडसाठी खूप क्रिकेट खेळलो आहे. आता पुढच्या पिढीची वेळ आहे, हेच मलाही समजवण्यात आले. मलाही ते योग्य वाटले. मी माझे योगदान दिली आहे. दरम्यान, मोईन अलीने 2014 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने 68 कसोटी, 138 एकदिवसीय आणि 92 आंतरराष्ट्रीय टी-20 सामने खेळले आहेत.