| न्यूयॉर्क | वृत्तसंस्था |
अमेरिकेच्या टेलर फ्रिट्झने मित्र आणि देशवासी फ्रान्सेस टियफोचा संघर्षमय उपांत्य लढतीत 4-6, 7-5, 4-6, 6-4, 6-1 असा पराभव केला. अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. टेलरने अंतिम फेरीत प्रवेश केल्याने तब्बल 18 वर्षानंतर अमेरिकन टेनिसपटू घरच्या मैदानावर अंतिम सामना खेळणार आहे. आता विजेतेपदासाठी फ्रिट्झची लढत अव्वल मानांकित इटलीच्या यानिक सिनरविरुद्ध होईल. यानिकने 25 व्या मानांकित ग्रेट ब्रिटनच्या जॅक ड्रेपरचा पराभव केला. यापूर्वी फ्रिट्झ आणि सिनर यांच्यात दोन लढती झाल्या असून गेल्यावर्षी झालेल्या लढतीत ऑस्ट्रेलियन ओपन विजेत्या सिनरने फ्रिट्झवर मात केली होती.