पाकिस्तानची धुरा रिझवानच्या खांद्यावर

। लाहोर । वृत्तसंस्था ।

पाकिस्तान क्रिकेट संघ पुढील महिन्यात ऑस्ट्रेलिया आणि झिम्बाब्वे दौर्‍यावर जाणार आहे. दोन्ही दौर्‍यामध्ये पाकिस्तान एकदिवसीय आणि टी-20 मालिका खेळणार आहेत. यासाठी रविवारी (दि.27) पाकिस्तान क्रिकेट संघाच्या निवड समितीने संघनिवड केली आहे. दरम्यान, पाकिस्तानचे एकदिवसीय आणि टी-20 संघांचे नेतृत्व कोण करणार, हे स्पष्ट केले नव्हते. मात्र, रविवारी पाकिस्तान बोर्डाने याचे उत्तर दिले आहे. संघ निवड जाहीर केल्यानंतर साधारण 4 तासांनी पाकिस्तान बोर्डाने नव्या एकदिवसीय आणि टी-20 कर्णधाराची घोषणा केली आहे. पाकिस्तानने ही जबाबदारी स्टार खेळाडू मोहम्मद रिझवान याच्या खांद्यावर सोपवली आहे. यामुळे बाबर आझमनंतर आता पाकिस्तान संघाचे कर्णधारपद मोहम्मद रिझवान सांभाळताना दिसणार आहे. त्याच्यासाठी कर्णधार म्हणून पहिलाच दौरा ऑस्ट्रेलियाचा असणार आहे.

ऑस्ट्रेलिया दौर्‍यासाठी पाकिस्तान संघ
एकदिवसीय संघ
: आमीर जमाल, अब्दुल्ला शफीक, अराफत मिन्हास, बाबर आझम, फैसल अक्रम, हॅरिस रौफ, हसीबुल्ला (यष्टीरक्षक), कामरान गुलाम, मोहम्मद हसनैन, मोहम्मद रिझवान (कर्णधार/यष्टीरक्षक), मुहम्मद इरफान खान, नसीम शाह, सईम आयुब, आगा सलमान, शाहीन शाह आफ्रिदी
टी-20 संघ: अराफत मिन्हास, बाबर आझम, हॅरिस रौफ, हसीबुल्ला, जहांदद खान, मोहम्मद अब्बास आफ्रिदी, मोहम्मद रिझवान (कर्णधार/यष्टीरक्षक), मुहम्मद इरफान खान, नसीम शाह, ओमेर बिन युसूफ, साहिबजादा फरहान, आगा सलमान, शाहीन शाह आफ्रिदी, सुफयान मोकीम, उस्मान खान.
Exit mobile version