| सुधागड-पाली | प्रतिनिधी |
सुधागड तालुक्यातील अनेक ठिकाणी हवामानातील सतत बदलामुळे आंब्याचा मोहर करपल्याचे चित्र दिसून आले आहे. यावर्षी आलेले पीक चांगल्या पद्धतीने होण्याची अपेक्षा होती; मात्र, वातावरणातील अनिश्चिततेमुळे मोहर वाळल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक बागांमध्ये मोहर जळाल्याने फळधारणेवर थेट परिणाम झाला असून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान बरेच झालेले आहे.
या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने काही ठिकाणी पाहणी केली आहे. मात्र शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, केवळ पाहणी पुरेसे नाही तर नुकसानग्रस्त बागांचे पंचनामे करून शासनाकडे अहवाल पाठवणे ही विभागाची जबाबदारी आहे. शासनाच्या निर्देशांनुसार पिक विमा योजनेच्या माध्यमातून योग्य ती नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी शेतकरी संघटनांकडून जोर धरत आहे. स्थानिक शेतकरी व संघटनांनी कृषी विभागाने तातडीने सर्व नुकसानग्रस्त ठिकाणी पंचनामे करून अहवाल शासनाकडे पाठवावा, जेणेकरून शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळेल, अशी मागणी जोर धरत आहे.
हवामानातील बदलामुळे मोहर वाळला
