| मुंबई | वृत्तसंस्था |
अल्पवयीन मुलींचा विनयभंग करणाऱ्या 46 वर्षीय आरोपीचा पाठलाग करून महिलेने पकडून दिल्याची घटना मुंबईतील मालाड येथे घडली आहे. महिलेची 13 वर्षांची मुलगी आणि तिच्या मैत्रिणीचा आरोपीने विनयभंग केला होता. महिलेने जिवाची परवा न करता आरोपीला पकडून धीले. आरोपी माँटी गरोडिया हा भाईंदर (पश्चिम) येथील रहिवासी आहे.
शुक्रवारी (दि.7) तक्रारदार महिलेची 13 वर्षांची मुलगी आणि तिची मैत्रिण (एक 13 वर्षांची मुलगी) या दोघी शाळेच्या प्रवेशद्वाराबाहेर येत असताना आरोपीने गर्दीचा फायदा उचलून मुलीचा विनयभंग केला. तक्रारदार महिलेच्या मुलीने आपल्यासोबत घडलेला प्रकार सांगितला असता, सुरुवातीला आपल्या मुलीला गर्दीत कोणीतरी चुकून स्पर्श केला असावा, असे समजून तिने त्याकडे दुर्लक्ष केले. पण आरोपी वारंवार तसा प्रकार करत असल्याचे मुलीने आईला सांगितले. त्यावेळी तक्रारदार महिलेने पारख ठेवून आरोपीला पकडण्याचा निर्णय घेतला.
पीडित मुलीची आई शाळेबाहेर मुलीची वाट पाहत असताना. पीडित मुलगी शाळेबाहेर आल्यावर आरोपी तिच्याजवळ आला. मुलीने त्या आरोपीबाबत आईला खूणवले. त्यानंतर तक्रारदार महिलेने त्या आरोपीला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, संशयिताने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मुलीच्या आईने काही अंतरापर्यंत त्याचा पाठलाग केला आणि गस्तीवर असलेल्या पोलिस पथकाच्या मदतीसाठी आरडाओरडा केला. त्यानंतर आरोपी गरोडियाला पकडण्यात आले. आरोपी गरोडिया याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी माँटी गरोडिया तुरुंगात डांबले असून कसून चौकशी केली आहे. त्याला लवकरच कोर्टात दाखल करण्यात आले आहे.







