। रोहा । प्रतिनिधी।
सुदर्शन कंपनीत फरसाण, अंडी पुरवठा करणारा बशीर उर्फ शब्बीर दस्तगीर किणी रा धाटाव याच्या सोबत संगनमत करून कंपनी गेट एंट्री रजिस्टर व बिले यामध्ये फेरफार करत मे 2020 ते जुलै 2021 या कालावधीत अकाऊंट विभागाची दिशाभूल करत एकूण पाच लाख त्रेपन्न हजार चारशे पंचवीस रुपयांचा अपहार केल्याचे दिसून आले आहे. धाटाव औद्योगिक वसाहती मधील नामांकीत अशा सुदर्शन केमिकल कंपनीत कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर कॅन्टीन सुपरवायझर म्हणून काम करत असलेला सागर चंद्रकांत शेलार याने अन्य एका आरोपी सोबत संगनमत करून सुमारे साडे पाच लाख रुपयांचा अपहार केला असून समीर वाढवळ यांनी दाखल केलेल्या फिर्यादी वरून रोहा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोनि संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.