चौल येथे एकपात्री अभिनय स्पर्धा

| रेवदंडा | प्रतिनिधी |

चौल भाटगल्ली येथे मोरया कला अकादमीच्या वतीने जेष्ठ अभिनेत्री आशालता बावगावकर यांच्या स्मरणार्थ एकपात्री अभिनय स्पर्धा सोमवार दि. 1 मे 2023 रोजी सायकांळी चार वाजता घेण्यात येत आहे.

मोरया अकादमी, प्रकाश कवळे यांचे निवासस्थानी ही स्पर्धा संपन्न होणार आहे. ही स्पर्धा दोन गटात घेण्यात येणार आहेत. यामध्ये तीन ते पाच मिनिटासाठी वय वर्ष 5 ते 14 वर्षे मध्ये 4 ते 7 मिनिटासाठी गट क्रमाक 1 व 15 वर्षापुढील गट क्रमांक दोन मध्ये स्पर्धा घेतली जाईल. दोन्ही गटात 3 बक्षिसे व सन्मानचिन्ह तर मोठा गट प्रथम क्रमांक रूपये 2 हजार, व्दितीय क्रमांक रूपये 1 हजार 500 व तृतीय क्रमांक रूपये 1 हजार रोख व छोटा गटास सुध्दा प्रथम क्रमांक रूपये 2 हजार, व्दितीय क्रमांक रूपये 1 हजार 500 व तृतीय क्रमांक रूपये 1 हजार रोख रक्कमेचे पारितोषीक ठेवण्यात आली आहेत.

सहभागी होण्यासाठी 28 एप्रिल 2023 पर्यंत प्रकाश कवळे (9969009721) व सुधाकर मेस्त्री ( 9702545012) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. प्रत्येक गटातील 20 प्रवेशिकाना प्रथम प्राधान्य देण्यात येईल असे कळविण्यात आले आहे.

Exit mobile version