एकपात्री अभिनय स्पर्धा

| रेवदंडा । वार्ताहर ।

चौल भाटगल्ली येथे मोरया कला अकादमीच्या वतीने जेष्ठ अभिनेत्री आशालता बावगावकर यांच्या स्मरणार्थ एकपात्री अभिनय स्पर्धा सोमवार दि.1 मे रोजी सायकांळी चार वाजता घेण्यात येत आहे.मोरया अकादमी, प्रकाश कवळे यांचे निवासस्थानी ही स्पर्धा संपन्न होणार असून ही स्पर्धा दोन गटात घेण्यात येणार आहेत. यामध्ये तीन ते पाच मिनिटासाठी वय वर्ष 5 ते 14 वर्षेमध्ये 4 ते 7 मिनिटासाठी, गट क्रमाक 1 व 15 वर्षापुढील गट क्रमांक दोनमध्ये स्पर्धा घेतली जाईल. दोन्ही गटात तीन बक्षिसे व सन्मानचिन्ह तर मोठा गट प्रथम क्रमांक रूपये दोन हजार, व्दितीय क्रमांक रूपये एक हजार 500 व तृतीय क्रमांक रूपये एक हजार रोख व छोटा गटास प्रथम क्रमांक रूपये दोन हजार, व्दितीय क्रमांक रूपये एक हजार 500 व तृतीय क्रमांक रूपये एक हजार रोख रक्कमेचे पारितोषीक ठेवण्यात आली आहेत.

सहभागी होण्यासाठी दि. 28 एप्रिल पर्यत प्रकाश कवळे भ्रमणध्वनी क्रमांक 9969009721, सुधाकर मेस्त्री भ्रमणध्वनी क्रमांक 9702545012 यांचेशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. प्रत्येक गटातील 20 प्रवेशिकाना प्रथम प्राधान्य देण्यात येईल असे कळविण्यात आले आहे.

Exit mobile version