| मुंबई | वृत्तसंस्था |
आता प्रतिक्षा संपली आहे. मान्सूनने केरळ आणि ईशान्य भारतात दाखल झाला आहे. हवामान विभागाने यासंदर्भात ट्वीट करत माहिती दिली आहे.
गेल्या काही दिवसांपासून मोसमी वाऱ्याचा वेग काहीसा मंदावला होता. लवकरच मोसमी वारे केरळमध्ये दाखल होतील, गुरूवारी (दि.30) मे रोजी हवामान विभागाने ट्वीट करत सांगितले होते. मान्सून वेळेआधीच केरळमध्ये पोहोचल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. त्यामुळे केरळमध्ये जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडत आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच चक्रीवादळ रेमलचा तडाखा केरळला बसला होता. त्यामुळे मान्सूनचा प्रवाह झपाट्याने बंगालच्या उपसागरात पोहोचला होता. यामुळे ईशान्येकडेही ढग वाढू लागले आहेत.
मान्सूनच्या प्रवासात सध्या कोणताही अडथळा नसून वेगानं प्रवास सुरू आहे. सोमवारी (दि.10) जूनपर्यंत मान्सून मुंबईत येईल असा अंदाज हवातान विभागाने वर्तवला आहे. यामध्ये मान्सून 10 ते 14 जूनच्या आसपास येऊ शकतो. तर संपूर्ण महाराष्ट्र व्यापण्यास 15 ते 21 जूनचा कालावधी लागेल असा प्राथमिक अंदाज आहे. यंदा पाऊस चांगला होईल असा हवामान विभागाने सांगितले आहे.