मॉन्सून महोत्सव उत्साहात

। रत्नागिरी । प्रतिनिधी ।

कोकणचे सुपुत्र कुणाल सरमळकर पुरस्कृत आणि उत्साही मित्रमंडळ म्हापण यांच्यावतीने पाट-देऊळवाडा येथील शरयू मंगल कार्यालयात दि. 25 व 26 जुलैला मॉन्सून महोत्सव उत्साहात संपन्न झाला. महोत्सवाचे उद्घाटन सरमळकर यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषद माजी सभापती विकास गवंडे यांच्या हस्ते झाले.
या दोन दिवसीय दशावतार नाट्यमहोत्सवात दशावतारप्रेमी नाना केळुसकर यांच्या संकल्पनेतून पहिल्या दिवशी गुरुवारी (दि.25) युवा कलाकारांचा ‘कर्ण दिग्विजय’ तर दुसर्‍या दिवशी शुक्रवारी (दि.26) ज्येष्ठ दशावतार कलाकारांच्या संचात ‘नैमिषारण्य निर्मिती’ हे नाट्य प्रयोग सादर करण्यात आले. या नाट्यप्रयोगांना रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी ग्रामपंचायत सदस्य गुरुनाथ मडवळ, पल्लवी सरमळकर, कांची सरमळकर, भाविका खानोलकर, दाजी जुवाटकर, नाट्यरसिक व अन्य मंडळी उपस्थित होती.

Exit mobile version