। अलिबाग । प्रतिनिधी ।
शेतकरी, कामगारांसह मागासवर्गीय घटकाच्या न्याय हक्कासाठी लढा देणारे रायगडचे भाग्यविधाते नारायण नागू पाटील यांची गुरुवारी (दि.29) जयंती रायगड जिल्ह्यात ठिकठिकाणी साजरी करण्यात आली.
स्व. प्रभाकर पाटील सांस्कृतिक मंच, प्रभाकर पाटील सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने अलिबागमधील रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात जयंतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. नारायण नागू पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी स्व. प्रभाकर पाटील सांस्कृतिक मंचचे अध्यक्ष सखाराम पवार, रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष नागेश कुलकर्णी, ज्येष्ठ नाट्यकर्मी व मंचाचे उपाध्यक्ष शरद कोरडे, सल्लागार आर. के. घरत, कोकण मराठी साहित्य परिषद अलिबाग शाखेचे सहकार्यवाह नंदू तळकर, पोलीस पाटील विकास पाटील, प्रभाकर पाटील वाचनालयाचे ग्रंथपाल ज्योती म्हात्रे, झेबा कुरेशी आदी उपस्थित होते.