| मुंबई | प्रतिनिधी |
कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीनंतर आता मुंबईतही मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे. दरम्यान, भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पाच दिवसांच्या विश्रांतीनंतर दक्षिण-पश्चिम मान्सूनने 23 मे रोजी पुन्हा प्रगती सुरू केली आहे. 18 मे रोजी मान्सून अंदमान-निकोबार बेटे, श्रीलंकेचे काही भाग आणि कोमोरिन परिसरात दाखल झाला होता. त्यानंतर त्याची वाटचाल काही दिवस थांबली होती. मात्र, शनिवारी मान्सूनने पुन्हा वेग घेत श्रीलंकेचा मोठा भाग, नैऋत्य आणि आग्नेय अरबी समुद्राचा काही भाग, बंगालच्या उपसागरातील काही क्षेत्र तसेच अंदमान समुद्राचा बहुतांश भाग व्यापला आहे. हवामान विभागाने यंदा 26 मेपर्यंत मान्सून केरळात दाखल होण्याची शक्यता वर्तवली आहे. तसेच बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्याने पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातही पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
दोन दिवसात मान्सून केरळात
