मुरूडला पावसाळी पर्यटन बहरणार

। मुरुड जंजिरा । वार्ताहर ।

रायगड जिल्ह्यात यंदा पाऊस जास्त असल्याचे भाकीत हवामान खात्याने केले आहे. यामुळे मुरूडला पावसाचे प्रमाण जास्त असेल. खारआंबोली धबधबा, गारंबी धबधबा, चिचघर धबधबा, नागशेत धबधबे पाण्याने पूर्ण लवकर भरल्यास मुरुडला पावसाळी पर्यटनाला येणार्‍या पर्यटकांची संख्या वाढणार आहे. मुरूडचेे पर्यटन पावसाळी विविध ठिकाणच्या धबधब्यामुळे बहरते. हॉटेल व्यावसायिकांची आर्थिक कोंडीपासून सुटका पावसाळी पर्यटनामुळे होते.

यंदा पावसाळ्यात पर्यटक आनंद घेण्यासाठी मोठ्या संख्येने येणार आहेत. त्यासाठी मुरुड परिसरातील हॉटेल व्यवसायिक तयारीत आहेत. परंतु, दरवर्षी होणारे अपघात पहाता जिल्हाधिकार्‍यांनी पर्यटकांवर पोलिसांची करडी नजर असणार आहे हे जाहीर केले. मुरुड तालुक्यात पर्यटनावर आर्थिक उलाढाल अवलंबून आहे, नोकर्‍या नसल्याने युवावर्ग पर्यटन व्यवसायात शिरत आहे. मुरुडला अनेक धबधबे असल्याने येणारे पर्यटकांची संख्या वाढली आहे आणि म्हणूच पोलिसांनी योग्य नियोजन केल्यास पर्यटन वाढेल, अशी आशा मुरुडकरांना आहे.

पावसाळी पर्यटनाच्या मर्यादित काळात अमर्याद पर्यटक विविध स्थळांना भेटी देतात. शनिवार-रविवार आणि जोडून सुट्ट्यांच्या काळात तर गर्दीचे विक्रम नोंदविले जातात. विशेषत: पावसाच्या सरी बरसत असताना कांदाभजी, भुट्टा, नॉनव्हेज, वडा-पाव खात खात भिजतानाचा आनंद घेण्यासाठी पर्यटनस्थळे हाउसफुल्ल होतात. स्थानिक प्रशासन कोलमडते आणि शेवटी बरीचशी पर्यटनस्थळे ऐन हंगामात बंद केली जातात. यातून स्थानिक रोजगार आणि महसूल मोठ्या प्रमाणात बुडतो. तरी होईल व्यवसायिकांची मागणी आहे कि धबधबे चालू ठेवा पोलिसांनी नियोजन करून मद्यपीवर कडक कारवाई करा पण अशी पर्यटन स्थळे बंद करू नका, धरणावर जाण्याची वेळ निश्‍चित करा व वाहनांसाठी पार्किंगची सुविधा करून पर्यटकांना शिस्त लावण्याचा प्रयत सरकारने करावा अशी मागणी व्यवसायिक करत आहेत. पर्यटनासाठी गारंबी धरण, सावंतखडा धबधबा, चिचघर धबधबा, खारआंबोली धरण आहे. हि पर्यटन स्थळे विकसित करण्याची गरज आहे. गारंबी धरणावर ओव्हरफ्लो होऊन पाणी नदीला वाहून जाते त्या बंधार्‍यावर जाण्यासाठी रस्ता करण्याची गरज आहे.

Exit mobile version