मान्सून होणार सक्रीय

| मुंबई | प्रतिनिधी |

सप्टेंबरमध्ये महाराष्ट्रात बहुतांश भागात सरासरीपेक्षा अधिक पाऊस होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने जाहीर केला आहे. संपूर्ण देशात या कालावधीत सरासरीच्या तुलनेत 109 टक्के पाऊस होणार असल्याचे हवामान शास्त्र विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी गुरुवारी (ता. 1) ऑनलाइन पत्रकार परिषदेत सांगितले.

राज्यात गेल्या दोन दिवसापासून काही ठिकाणी जोरदार पाऊस कोसळत आहे. मुंबई, ठाणे, पुणे, सोलापूर, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, बीड, उस्मानाबाद, नांदेड, सातारा, सांगली, लातूर, चंद्रपूर, अमरावती, परभणी, गडचिरोली, वर्धा आदी जिल्ह्यांत या महिन्यात अधिक पाऊस होण्याचा अंदाज आहे.

Exit mobile version