कोमसाप रोहा शाखेची मासिक सभा

। खांब-रोहा । वार्ताहर ।
कोकण मराठी साहित्य परिषद रोहे शाखेची मासिक सभा व कोजागिरी पौर्णिमेनिर्मित्त कवितेचे चांदणे हा कार्यक्रम परिषदेचे सुधीर क्षीरसागर यांचे अष्टमी रोहा येथील निवासस्थानी घेण्यात आला. सदर कार्यक्रमास रोहा शाखाध्यक्षा संध्या दिवकर, सुखद राणे, विजय दिवकर, नारायण पानवकर, आरती धारप, अचला धारप, सुधीर क्षीरसागर, संजीव शेरमकर, शरद कदम, अजित पाशिलकर, नेहल प्रधान, अमिषा बारस्कर, स्वराज दिवकर इ . कवी कवयित्री उपस्थित होते. कवी केशवसुत यांच्याबद्दल माहिती सांगून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.नारायण पानवकर यांनी उपस्थितीतांचे आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी संजय क्षीरसागर, सुजाता क्षीरसागर,.सुधीर क्षीरसागर, व सुप्रिया क्षीरसागर यांनी मेहनत घेतली.

Exit mobile version