। खांब-रोहा । वार्ताहर ।
को.म.सा.प.शाखा-रोहातर्फे रविवारी (दि.3) महाकवी कालिदास दिन व मासिक सभा श्री योगनिवास, गायत्रीनगर,भुवनेश्वर,रोहा येथे संपन्न करण्यात झाली. अध्यक्षा संध्या विजय दिवकर यांनी प्रास्ताविक केले व पुढील वर्षभरातील कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले.जिल्हा प्रतिनिधी सुखद राणे व सहदेव कापसे यांनी कवी कालिदासांविषयी माहिती सांगितली. वृद्धि भगत, सुलोचना नार्वेकर, सहदेव कापसे, आरती धारप यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमास आरती धारप, हनुमंत शिंदे, नारायण पानवकर, शरद कदम, वृद्धी भगत, विकास भोईर, अजित पाशिलकर, स्वराज दिवकर उपस्थित होते.