मासिक संगीत सभा संपन्न

| पनवेल | वार्ताहर |

ब्रह्मचैतन्य मासिक संगीत सभेचे 22 वे पुष्प अतिशय उत्साहात आणि आनंदात पार पडले. पनवेल येथील श्री गोंदवलेकर महाराज नामस्मरण केंद्रात संपन्न झालेल्या या संगीत सभेमधे युवा शास्त्रीय गायिका सिद्धी पटवर्धन हिचे गायन संपन्न झाले. या कार्यक्रमाला पनवेल परिसरातील रसिकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. सिद्धी हिने संगीत सभेचा प्रारंभ पटदीप या रागाने केला व त्याच रागातील मफबरखा बहारफफ ही बंदिश सादर केली. त्यानंतर तिने राग मबागेश्रीफ मधील द्रुत एक तालातील बंदिश सादर केली. नंतर राग मिश्र मल्हार मधील आई ऋतू सावन की ही बंदिश सादर केली.

त्यानंतर संगीत मानापमान नाटकातील युवती मना हे नाट्यगीत, वाजे वृंदावनी वेणू व अमृताहुनी गोडहे अंभंग सादर करुन वातावरण भक्तिमय केले. शाम सुंदर मदन मोहन ही भैरवी सादर करून संगीत सभेची सांगता केली.राजेंद्र काळे यांनी संवादिनी, व अवधूत घेवडेकर यांनी तबला साथ व चैतन्य कोशे यांनी तालवाद्यांची साथ केली. मठातील ज्येष्ठ साधक गजानन घाणेकर यांनी कार्यक्रमाचे निवेदन केले. मठातील साधक व कार्यकर्त्यांनी ही संगीत सभा यशस्वी करण्यासाठी मोलाचे योगदान दिले.

Exit mobile version