मोरा-भाऊचा धक्का तिकीट दर 15 रुपयांनी कमी

। उरण । प्रतिनिधी ।

मोरा-भाऊचा धक्का या सागरी मार्गावरील प्रवासी वाहतूक तिकिट दरात पावसाळी हंगामासाठी केलेली दरवाढ 1 सप्टेंबरपासून मागे घेण्यात आली आहे. यामुळे तिकिट दर 15 रुपयांनी कमी होणार आहे.

दरवर्षी पावसाळी हंगामात मोरा-भाऊचा धक्का या सागरी मार्गावरील प्रवासी वाहतूक तिकिट दरात वाढ केली जाते. दोन वर्षांपूर्वी तिकिट दर 75 रुपयांवरुन 90 रुपये झाले होते. तसेच 26 मे 2022 पासून याच सागरी मार्गावरील पावसाळ्यातील जुन, जुलै, ऑगस्ट या तीन महिन्यांच्या पावसाळी हंगामासाठी प्रवासी वाहतूक तिकिट दरात 90 रुपयांंवरुन थेट 105 रुपयांपर्यंत अशी 15 रुपयांची वाढ करण्यात आली होती. 1 सप्टेंबरपासूनच मुंबई जलवाहतूक संस्थेने या सागरी मार्गावरील करण्यात आलेली दरवाढ कमी केली आहे. तसेच या सागरी मार्गावरील प्रवासी बोट सेवा उन्हाळी हंगामाप्रमाणे पुर्ववत वेळेप्रमाणे सूरू होणार असल्याची माहिती मोरा बंदर विभागाने दिली.

Exit mobile version