समुद्रात गाळ साचल्याने मोरा-रेवस, करंजा फेरी बोटी बंद

। उऱण । वार्ताहर ।
समुद्रात साचलेल्या गाळ न काढल्याने मोरा, रेवस आणि करंजा दरम्यान रविवारीपर्यत फेरी बोटी बंद करण्यात आले आहे. त्यामुळे फेरी बोट चालकांचा दररोज ओहटीदरम्यान 30 फेरी रद्द कराव्या लागत आहेत. त्यामुळे फेरी बोट चालकांचे मोठे नुकसान होत आहे. सागरी महामंडळाने आतापर्यंत समुद्रातील गाळ काढण्यासाठी कंत्राटदार शोधत असल्याची माहिती मिळत आहे.

प्रवासी बोटी सुरक्षित आणि नियमितपणे चालाव्यात याकरिता मांडवा, मोरा, रेवस आणि करंजा दरम्यान दरवर्षी नियमितपणे कोट्यवधी रुपये खर्च करून सागरी महामंडळाकडून समुद्रात साचलेल्या गाळ काढण्यात येतो. मात्र तरीही वांरवार गाळ साचत असल्यान फेरी बोटी बंद कराव्या लागतात. विशेष म्हणजे समुद्रात आलेल्या ओहटी दरम्यान सुरक्षेचा दृष्टिकोनातून फेरी बोटी बंद कराव्या लागतात. सध्या समुद्रात भरती-ओहटी असल्याने 27 नोव्हेंबर पर्यत दररोज तीन ते चार तासासाठी भाऊचा धक्का ते मोरा, भाऊचा धक्का ते रेवस आणि करंजा ते भाऊचा धक्का दरम्यान प्रवासी बोटी बंद करण्यात आलेल्या आहे.

दररोज प्रत्येक मार्गावर दोन्ही दिशेचा प्रत्येकी 10 फेर्‍या अशा 30 फेर्‍या रद्द कराव्यात लागत आहे. त्यामुळे फेरी बोट चालक- मालकांचे मोठे नुकसान होत आहे. सागरी महामंडळाकडून दरवर्षी मार्च ते मे महिन्याच्या दरम्यान समुद्रतील साचलेला गाळ काढण्याचे काम करतात. प्रत्येक्षा पावसाळा झाला की परिस्थिती जैसे थे असते. त्यामुळे प्रवाशांना मोठा फटका बसत आहे. एकीकडे सरकार जल प्रवासी वाहतुकीला प्रोत्साहन देत आहे. मात्र, राज्यात ब्रिटिश कालीन जुन्याच जेट्टीवर जल वाहतूक केली जात आहे. तसेच दिवसेंदिवस समुद्रात मोठा भराव टाकण्यात येत असल्याने समुद्रात गाळ साचण्याचे प्रमाणात वाढले. दरवर्षी सागरी महामंडळाकडून कोट्यवधी रुपये खर्च करून गाळ काढण्यात येतात. मात्र, यावर कायमस्वरुपी उपाय शोधला पाहिजे. कारण समुद्रात ओहटी दरम्यान फेरी बोटी बंद कराव्या लागतात.

समुद्राच्या पाण्याची पातळी कमी जास्त होते.त्यामुळे समुद्रात दिवसेंदिवस गाळ साचण्याचे प्रमाणात वाढत जात आहे. त्यामुळे यावर उपाय शोधण्यासाठी सागरी महामंडळाने अभ्यास गट नेमावा.

फेरी बोट चालक
Exit mobile version