। नांदगाव । वार्ताहर ।
मुरुड तालुक्यातील मोरे गावच्या मोरबा देवीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व मंदिराच्या उद्घाटनाचा सोहळा नुकताच मोरे गावी मोठ्या उत्साहात पार पडला. शेतकरी कामगार पक्षाचे रायगड जिल्हा चिटणीस आ.जयंत पाटील यांच्या हस्ते नारळ वाढवून तर रायगड जिल्हा परिषदेच्या सदस्या नम्रता कासार यांनी फीत कापून मंदिराचे उद्घाटन केले.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष मंगेश दांडेकर, अजित कासार, रमेश दिवेकर, दामोदर राऊत, माजी सरपंच विद्याधर चोरघे, मुसरत उलडे, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या सोहळ्यात महाप्रसाद, होमहवन, छोट्यांचे विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम, स्थानिक भजनी बुवांची सुस्वर भजने आदी कार्यक्रम पार पडले. स्थानिक ग्रामस्थांसह येथिल पंचक्रोशीतील दानशूर भाविकांनी केलेल्या आर्थिक मदत व केलेल्या अथक परिश्रमाने मंदिराच्या जिर्णोद्धाराचे काम करण्यात आले आहे. आ.जयंत पाटील व इतरांनीही त्याकरिता मोठे सहकार्य केले आहे.







