| आगरदांडा | प्रतिनिधी |
मुरुड तालुक्यातील सुपेगाव येथील सुमारे 54 कि.मी.क्षेत्र परिसरात फणसाड अभयारण्य क्षेत्राचा विस्तार झालेला आहे. नवाब सरकाराने हे अभयारण्य स्वातंत्र्यपुर्व काळापासून सुरक्षित केलेला आहे. या अभयारण्यात 19 प्रकारचे वन्यप्राणी आहेत.
वाढत्या उष्णतेने कहर केला असून,जीव कासावीस होत आहे. ऐन मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच उन्हाची तीव्रता वाढली असून, उष्णतेच्या तप्त झळा जाणवत असल्याने नदी, नाले, जंगलातील पाणवठे पाण्याअभावी कोरडे पडल्याने वन्य प्राण्यांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. जंगलात पाण्याअभावी कोरडे पडलेले पाणवठे वनविभागाच्या प्रयत्नाने पाण्याने तुडुंब भरले आहे. त्यामुळे वन वन भटकंती करणाऱ्या वन्यप्राण्यांचे प्रश्न सुटला आहे.
या जंगलात बिबट्या, सांबर, भेकरे, डुक्कर, पिसोरी, ससा, कालामांजर, रानमांजर, जवादा, सालिंदर, मुंगा, वानर, मोर, रान कुत्रा, गवा, गिधाड, आदी प्राण्यांचे वास्तव्य आहे. तसेच या अभयरण्यात 718 प्रकारचे वृक्ष, 19 प्रकारचे सस्तन प्राणी, 27 प्रकारचे साप, 190 प्रकारचे रंगी-बेरंगी पक्षी, 130 प्रकारची फुलपाखरे यामध्ये ब्लु मॉरमॉन, मॅप, व आदी फुलपाखरु दिसून येतात. या बरोबर नाग, फुरसे, घोणस, मण्यार असे विषारी व हरणटोळ, अजगर सारखे बिनविषारी साप येथे आढळत असतात. या प्राण्यांना पुर्वीपासून पिण्यासाठी जंगल भागात नैसर्गिक पाण्याची 27 जलस्त्रोत्र आहेत. परंतु फेब्रुवारी, मार्च, एप्रिल व मे महिन्याच्या कडक उन्हाळ्याच्या वाढत्या तापमानामुळे पाण्याचे तलाव सुके होत जाते यामुळे वन्य प्राण्यांची पाण्यासाठी भटकंती होऊ नये. मानव वस्तीत जाऊन नये त्याकरिता फणसाड अभयारण्या मध्ये असणाऱ्या नैसर्गिक केतकीची गाण, सावरट तलाव, चिखलगाण, धरणाची गाण, सव्रत तलाव, बांध तलाव असे विविध 27 पाण्याचे पाणवठ्यांमध्ये आठवड्यातून एकदा टेम्पो द्वारे हाजोरो लिटर पाणी सोडण्यात येत असल्याने जलस्रोत पाण्याने तुडुंब भरल्याने या उपक्रमांमुळे वन्य प्राण्यांच्या तृष्ण तृप्तींची सोय केली गेल्याने प्राणी- पक्षी प्रेमींनी समाधान व्यक्त केले.
वनपाल अधिकारी
वनक्षेत्रातील आटलेले नदी-नाले व नैसर्गिक जलस्रोत बघता वनविभागाने वनक्षेत्रातील वन्य जीवांसह पशुपक्ष्यांची तहान भागवण्यासाठी वनक्षेत्रात परिसरात कृत्रिम पाणवठे तयार केले आहेत. फेब्रुवारी महिन्यांपासून निसर्ग जलस्त्रोत पाणी कमी होत असल्याने वन्य प्राण्यांची गैर सोय होऊ नये त्याकरिता फणसाड अभयारण्या मार्फत कृत्रिम पाणवठे दुरुस्त करून त्यामध्ये हजारो लिटर टेम्पो द्वारे पाणी सोडण्याची व्यवस्था केली आहे. याकरिता वनपाल दिवसरात्र मेहनत घेत आहेत.







