मोरबे धरणाचे दरवाजे पुन्हा उघडले

नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

| वावोशी | प्रतिनिधी |

नवी मुंबई महानगरपालिकेच्या मोरबे धरणाची महत्तम पाणीपातळी 88.00 मीटर इतकी आहे. माथेरान डोंगर भागात सातत्याने पाऊस होत असल्यामुळे धरणातील पाण्याची पातळी वाढली आहे. त्यामुळे सोमवारी, (दि. 25) सकाळी साडेअकरा वाजता मोरबे धरणाचे दोन्ही वक्राकार दरवाजे 25 सेंटीमीटरने उघडण्यात आले असून, याद्वारे धरणातून सुमारे 1123 क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू झाला आहे. यामुळे धावरी व पाताळगंगा नदीकाठी असलेल्या गावांमध्ये पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता असल्याने संबंधित प्रशासनाकडून सर्व ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नवी मुंबई महानगरपालिका, खालापूर तहसीलदार कार्यालय व पोलीस प्रशासनाकडून नागरिकांना नदीपात्रात न उतरण्याचे तसेच आवश्यक तेथे सुरक्षिततेची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

Exit mobile version