मोरबे ते करंबळी रस्ता खड्ड्यात

| नवीन पनवेल । वार्ताहर ।
प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतुन बांधण्यात आलेला मोरबे ते करंबेळी रस्ता खड्ड्यात गेला आहे. ठिकठिकाणी खड्डे पडल्याने वाहने चालवायची कशी असा प्रश्‍न वाहन चालकांना पडत आहे. तालुक्यातील खैरवाडी, कोंडले, येरमाळ, गारमाळ, करंबेळी, फणसवाडी, भल्याचीवाडी आदी ठिकाणच्या हजारो आदिवासींना वर्षानुवर्षे या रस्त्यावरूनच पायपीट करावी लागत होती. प्रधानमंत्री ग्राम सडक योजनअंतर्गत बांधण्यात आलेल्या या रस्त्यामुळे हा पायपिटीचा वनवास संपला. मात्र सद्यस्थितीत रस्त्यावर प्रचंड मोठमोठे खड्डे पडले आहेत. प्रधानमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत तीन कोटीहून अधिक रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या या रस्त्याची लांबी 7.905 किलोमीटर आहे. या रस्त्यामुळे 8 ते 10 आदिवासी वाड्यां एकमेकांशी जोडल्या गेल्या आहेत. या रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडल्याने आदिवासीबांधव निराश झाले आहेत.

Exit mobile version