नूपूर शर्मा, रवि जिंदाल यांच्या अटकेच्या मागणीसाठी मुस्लीम समाजाचा मोर्चा

सांगोल्यातनुपूर शर्मा व नवीन जिंदाल यांच्या अटकेची मागणी
| सांगोला | प्रतिनिधी |

इस्लाम धर्माचे संस्थापक पैगंबर मुहम्मद यांच्या विषयी वादग्रस्त वक्तव्य करून मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा व नवीन जिंदाल यांच्यावर तातडीने कारवाई करून त्यांना अटक करावी, या मागणीसाठी सांगोला शहरात मुस्लिम समाजबांधवांनी सोमवारी (13 जून) निषेध मोर्चा काढून तहसीलदार अभिजित पाटील यांना निवेदन दिले.


सांगोला बंदचे आवाहन करण्यात आले होते, यावेळी शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच व्यापारी आणि दुकानदारांनी बंदल प्रतिसाद दिला होता. नही छोडेगे, नही छोडेगे… बी का दाम.. नही छोडेगे , या रसूल, या रसूल अशा घोषणा देत आणि नुपूर शर्मा व नवीन जिंदाल यांच्या विरोधात घोषणा देत शहरातील कडलास नाका येथून मोर्चाची सुरुवात करण्यात आली. सदर मोर्चा मुजावर गल्ली, पठाण गल्ली, भोपळे रोड, स्टेशन रोड, भाजी मंडई परिसर,नगरपालिका परिसर, मेन रोड मार्गे सांगोला तहसील कार्यालयाला समोर निवेदन देण्यासाठी गेला.


यावेळी मनोगत व्यक्त करताना समाजातील मान्यवरांनी नुपूर शर्मा व नवीन जिंदाल यांच्यावर तातडीने कारवाई करून त्यांना अटक करावी अशी मागणी केली. सांगोला बंदला उस्फुर्त प्रतिसाद दिला म्हणून मुस्लिम समाजाकडून व्यापारी बांधवांचे आभारही मानण्यात आले. सदरच्या मोर्चात लहान मुलांपासून ते जेष्ठ नागरिकांनी, समाजातील मान्यवरांनी सहभाग घेतला होता तर सांगोला पोलीसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

महाडमध्ये मुस्लीम समाजाचा मोर्चा
। महाड । प्रतिनिधी ।
प्रतिष महंदम पैगंबर यांच्याविषयी बोताल वक्तव्य करून, मुस्लीम समाजाच्या भावना दुखावल्याप्रकरणी भाजपाच्या प्रवक्त्या नूपूर शर्मा आणि रवि जिंदाल यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी या मागणीसाठी आज महाड शहरात मुस्लीम समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. अरबिया मद्रसा जमातुल मुस्लीमीन (खारकांड मोहोल्ला, महाड), हजरत ख्वाजा गरिब नवाज फाऊंडेशन,महाड, आणि महाड पोलादपूर तालुक्यातील मुस्लीम समाजाच्या वतीने या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.

महाड शहरातील जामा मशिदीपासून या मोर्चाला प्रारंभ झाला. तो तहसिल कार्यालयापर्यंत नेण्यात येवून, तेथे राष्ट्रपतींना देण्यासाठी एक निवेदन तहसिलदार सुरेश काशिद यांच्याकडे देण्यात आले. नूपूर शर्मा आणि रवि जिंदाल यांनी प्रेषित महंमद पैगंबर यांच्याबद्दल अत्यंत आक्षेपार्ह वक्तव्य करून संपूर्ण जगातील मुस्लीम समाजाच्या भावना दुखावल्या असून, त्यांच्या श्रध्देला ठेच पोहोचवली आहे. त्यांच्या या वक्तव्याप्रकरणी महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून, त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.

या मोर्चामध्ये अरबिया मद्रसा जमातुल मुस्लीमीन चे अध्यक्ष सत्तार तरे यांच्यासह महंमद अली पल्लवकर, अकबर तरे, अकबर ताज, वजीर कोंडीवकर, अस्लम पानसरी, मेहबूब कडवेकर, मुफ्जी अजगर, मुफ्ती पूरकर, मन्सूर देशमुख, रिहान देशमुख, मन्सूर ताज, आलखाक गोडमे, अल्फला देशमुख, अस्लम जलाल, समाजातील सर्व मौलाना, मुफ्ती, कारी यांच्यासह शेकडो मुस्लीम स्त्री पुरूष सहभागी झाले होते. हा मोर्चा शांततेत पार पडला. पोलिसांनी मोर्चादरम्यान, कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.

Exit mobile version