| सुकेळी | वार्ताहर |
बी.सी. जिंदाल रुग्णालय सुकेळी येथे जिंदाल रुग्णालय व मेयर वीटावायोटीक यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार, दि. 2 व बुधवार, दि. 3 मे रोजी मोफत हाडांची घनता तपासणी शिबिराचे आयोजन सकाळी 10 ते सायं. 5 या वेळेत करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये हाडांची घनता तपासून योग्य असे मार्गदर्शन तज्ज्ञ डॉक्टरांकडून करण्यात येणार असल्याचे जिंदाल रुग्णालयाचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. गोपाळ परमार यांनी सांगितले आहे.







