पोयनाडबद्दल विशेष आपुलकीमुळे जास्त विकास- पंडित पाटील

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
मी पोयनाडच्या शाळेत प्राथमिक शिक्षण घेतले असून पोयनाड बद्दल एक अतुट असे नाते आहे. या गावाबद्दल मला आपुलकी असून गावाच्या जास्तीत जास्त विकासासाठी अनेक योजना राबविण्यात येणार असल्याचे प्रतिपादन शेकाप नेते माजी आमदार पंडित पाटील यांनी केले. पोयनाड येथिल बुधिरदेव मंदिर येथे सभा मंडपाचे आणि बाल उद्यानाचे भूमीपुजन पंडीत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी उपस्थित असलेल्या ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना पंडीत पाटील बोलत होते. यावेळी त्यांनी आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा देताना मी पोयनाडच्या मराठी शाळेत सातवी पर्यंत मी शिक्षण घेतले आहे. त्यामुळे पोयनाड गावाबद्दल मला आपुलकी आहे पोयनाड साठी अनेक योजना राबविण्यात येतील. त्याच बरोबर शेकपक्ष हा सर्व सामान्यांची कामे करणारा पक्ष आहे अनेक कामे करून सिद्ध करून दाखवुन दिले आहे, म्हणूनच आजही लोक शेकापक्षाच्याच मागे ठामपणे उभी आहेत असा विश्‍वासही यावेळी पंडीत पाटील यांनी आपल्या भाषणात शेवटी व्यक्त केला.

या वेळी शेकापचे जिल्हा चिटणीस जिपसदस्य अ‍ॅड आस्वाद पाटील, जि प सदस्या चित्रा पाटील, पंचायत समिती सभापती प्रमोद ठाकूर, पोयनाड ग्रा पं सरपंच सौ शकुंतला काकडे, माजी सरपंच भुषण चवरकर, ग्रा प सदस्य अजित चवरकर, माजी सदस्य विजयेंद्र तावडे, चवरकर कुलस्वामिनी सेवा संघाचे अध्यक्ष सुधीर चवरकर व अन्य मान्यवर उपस्थित होते

Exit mobile version