सूर्यकुमार यादव याच्याबद्दल प्रश्नच अधिक

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

मागील सहा एकदिवसीय सामन्यात सूर्यकुमार यादव याला नावाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. वेस्ट इंडिजविरोधात झालेल्या तीन एकदिवसीय सामन्यातही तो अपयशी ठरला होता. त्याला साधे अर्धशतकही ठोकता आले नाही. तेव्हा त्याच्या धावा होत्या – १९, २४ आणि ३५. तर त्याआधी मायदेशात ऑस्ट्रेलियाविरोधात झालेल्या एकदिवसीय मालिकेत सूर्याला तीन सामन्यात खातेही उघडता आले नव्हते. तो लागोपाठ तीन सामन्यात शून्यावर बाद झाला होता. सूर्यकुमार याने एकदिवसीय सामन्यातील अखेरचं अर्धशतक 2022 फ्रेबुवारीमध्ये झळकावले होते. त्यानंतर तो सातत्याने लवकर बाद होतोय. सूर्यकुमार यादव याने आतापर्यंत २६ एक दिवसीय सामन्यांमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केलेय. यामधील २४ डावात त्याने २४ च्या सरासरीने ५०४ धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राईक रेट 101 इतका आहे. यादरम्यान त्याने दोन अर्धशतके ठोकली आहेत.

सूर्याऐवजी चहल हवा होता
टी 20 मध्ये सूर्या उत्तम फलंदाज आहे. त्याच्या तोडीला कुणीही नाही.. पण एकदिवसीय सामन्यातील त्याच्या कामगिरीबाबत अनेक प्रश्न आहेत.   सूर्यकुमार यादव याच्याऐवजी एखादा फिरकी स्पेशालिस्ट संघात ठेवल्यास फायदा होऊ शकतो असे जाणकारांचे म्हणणे आहे. भारतीय खेळपट्टीवर फिरकी गोलंदाजी प्रभावी ठरते. आशावेळी आर. अश्विन अथवा युजवेंद्र चहल यांना संधी द्यायला हवी.भारतीय संघात एकही ऑफ स्पिनर फिरकी गोलंदाज नाही. प्रतिस्पर्धी संघात डावखुऱ्या फलंदाजांची संख्या जास्त असेल त्यावेळी हे अडचणीचे ठरेल.

Exit mobile version