मुंबईतील 26 मशिदींमध्ये सकाळची अजान लाऊडस्पीकरशिवाय

। मुंबई । वार्ताहर ।
महाराष्ट्रात सुरु असलेल्या लाऊडस्पीकर वादाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील मुस्लीम धर्मगुरुंनी एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार आता पहाटेची अजान लाऊडस्पीकरशिवाय होणार आहे. बुधवारी रात्री उशिरा दक्षिण मुंबईतील सुमारे 26 मशिदींच्या मौलवी आणि ट्रस्टींची बैठक झाली. या बैठकीत सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार, आता लाऊडस्पीकरशिवाय सकाळची अजान देण्यात येमार असल्याचे सांगण्यात आले. सुन्नी बडी मशीद याठिकाणी ही बैठक पार पडली. ज्यामध्ये भायखळ्यातील मदनपुरा, नागपाडा आणि आग्रीपाडा भागातील मुस्लीम मौलवी, धर्मगुरु आणि मशिदींचे ट्रस्टी एकत्र आले होते.
कोर्टाच्या आदेशानुसार, रात्री 10 ते सकाळी 6 या वेळेत लाऊडस्पीकरवर अजान होणार नाही असा निर्णय बैठकीत घेण्यात आला, यानंतर प्रसिद्ध मिनारा मशिदीत लाऊडस्पीकरशिवाय सकाळची अजान देण्यात आली.

Exit mobile version