पनवेल | वार्ताहर |
कळंबोली परिसरात राहणार्या एका 17 वर्षीय महाविद्यालयीन तरुणीचा मोबाईल नंबर व फोटोचा वापर करुन तिच्या नावाने बनावट इन्स्ट्राग्राम अकाऊंट तयार करुन त्यावर मॉर्फ केलेले तरुणीचे अश्लील फोटो, व्हिडीओ तसेच अश्लील मेसेज टाकून सदर तरुणीची बदनामी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कळंबोली पोलिसांनी या प्ररकरणातील अज्ञात व्यक्तीविरोधात आयटी अॅक्टसह बदनामीकारक माहिती प्रसिद्ध केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करुन त्याचा शोध सुरु केला आहे.






