पनवेल | वार्ताहर |
दुकानातून चहापत्ती घेऊन येते असे सांगून घरातून निघून गेलेली बावीस वर्षीय प्रीती रामभाऊ ठाकूर (रा. पाले खुर्द, देवीचा पाडा) ही तरुणी हरवली असल्याची तक्रार पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. तिची उंची पाच फूट, पाच इंच, रंग सावळा, चेहरा उभट आहे. ती अंगाने सडपातळ असून, अंगात पंजाबी ड्रेस घातलेला आहे. तिने नाकात चमकी आणि उजव्या हातामध्ये मरून रंगाचा धागा बांधलेला आहे. तिला मराठी आणि हिंदी भाषा बोलता येते. या तरुणीबाबत अधिक माहिती असल्यास पोलीस नाईक बीपी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.