चिंचवलीतून मायलेक बेपत्ता

| पनवेल | वार्ताहर |

पनवेल तालुक्यातील चिंचवली गोविंदनगर येथील एक 27 वर्षीय महिला आपल्या तीन वर्षांच्या मुलाला घेऊन कोणास काही एक न सांगता घरातून निघून गेली, ती अद्याप परत आलेली नाही. त्यामुळे पनवेल तालुका पोलीस ठाण्यात ती बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. शुभांगी सचिन पैठणे असे बेपत्ता महिलेचे नाव असून तिची उंची पाच फूट, नाक नकटे, केस लांब, डोळे काळे, बांधा मध्यम आहे. तिने अंगान कुडता व पायजमा घातलेला आहे. तर तिचा मुलगा कार्तिक तीन वर्षांचा असून त्याची उंची तीन फुट, नाक नेटके, केस बारीक, डोळे काळे, बांधा मध्यम आहे. त्याने अंगात भगवा टी- शर्ट व काळी हाफ पॅन्ट घातली आहे. ही महिला व मुलगा कोणास दिसल्यास पनवेल तालुका पोलीस ठाणे येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Exit mobile version