चिमुकल्यास आईची आत्महत्या

| सोलापूर | प्रतिनिधी |

सोलापूरच्या बार्शी तालुक्यात एका आईने आपल्या लहान मुलासह आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बार्शी शहरातील वाणी प्लॉट परिसरात घडली. मृत महिलेचे नाव अंकिता वैभव उकिरडे असे आहे. अंकिता ही विवाहित असून, तिला 14 महिन्यांचा मुलगा होता. अंकिताने आपल्या चिमुरड्याला विष पाजून त्यानंतर साडीने गळफास लावून आत्महत्या केल्याचा प्रकार शुक्रवारी सकाळी उघडकीस आला होता. मात्र, यामध्ये अंकिता यांचा मुलगा अन्विक उकिरडे हा वाचला आहे. परंतु, त्याची प्रकृती गंभीर आहे. अंकिता उकिरडे यांनी टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. मात्र, या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

Exit mobile version