| उरण | वार्ताहर |
उरण येथील साई संस्था संचलित नगराजशेठ सीबीएसई इंटरनॅशनल स्कूलमध्ये आरोग्य विभाग रा.जि.प. आयोजित माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियान आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचा प्रारंभ संस्थेचे अध्यक्ष नरसू पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. शिबिराचा लाभ परिसरांतील 70पेक्षा अधिक महिलांनी घेतला.यावेळी उपस्थित पुरुषवर्गानेही आपली तपासणी करून घेतली.यावेळी प्रदीप पाटील, डॉ.राजेंद्र इटकर, डॉ.बाबासो कालेल, डॉ.स्वाती म्हात्रे,संतोष पगारे,प्राची पाटील.संगीता शिंदे,सुप्रिया पाटील,विलासिनी बोरवेकर आदी उपस्थित होते. शिबीर यशस्वी करण्या साठी प्रिन्सिपॉल इशिका मॅडम. .ज्योती मॅडम. सुवर्णा शर्मा मॅडम,तेजल पठानिया मॅडम,भार्गवी पाटील मॅडम,शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.







