| तळे | वार्ताहर |
तळा आर्टिस्ट असोसिएशन तर्फे दिवाळी निमित्त भव्य कलाप्रदर्शन दिवाळी पहाटेची औचित्य साधून दिनांक 23 ते दिनांक 26 ऑक्टोंबर असे चार दिवस चित्र-शिल्प-छायाचित्र आणि लेख-कला प्रदर्शन रोज सकाळी 7 वा. पासून सायंकाळी 7 वा. पर्यंत आयोजित केले आहे. या कला प्रदर्शनाचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन तळा आर्टिस्ट असोसिएशन तर्फे करण्यात येत आहे. तळे शहरात असा प्रयोग प्रथमच होत आहे त्यामुळे विविध क्षेत्रात काम करणार्या आर्टिस्ट., कला, साहित्य, लेखक, गीतकार अशा होतकरू युवक-युवतींना हे व्यासपीठ उपलब्ध होऊ शकते. ग्रामीण भागातही असे कलाकार दडलेले आहेत. त्यांनी पुढे येऊन या संधीचा फायदा घेत तळा आर्टिस्ट असोसिएशनची संपर्कात राहावे. जेणेकरून भविष्यात पुढील वाटचालीसाठी दिशा मिळेल.
23 ऑक्टोबर सकाळी 9 पिटसई कोंड येथील ज्येष्ठ चित्रकार शिंदे गुरुजी यांच्या हस्ते कलादालनाचे उद्घाटन तर विनोद कोलवणकर यांचे हस्त्रे श्रीफळ वाढवून शुभारंभ करण्यात येणार आहे. सकाळी 11 वा. आई दर्शन घेईन मी नारळ पुनव फेम मीरा निलेश कार्लेकर (छ. ग. चशशीर) यांची विशेष उपस्थिती सायंकाळी 5 वा. पंडित अजित कडकडे यांचे शिष्य डॉ. संतोष प्रकाश झापकर यांचे संगीतमय कार्यक्रम.24 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वा. कलाकारांचे प्रात्यक्षिक सहभाग कैलास सातांबेकर, आकाश शिंदे, नामदेव शिंदे. 25 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वा. छायाचित्रणावर बोलू काही समीर देशमुख आणि शार्दुल देशमुख .26 ऑक्टोबर सकाळी 10 वा. श्रेयस रोडे यांचे कथाकथन असा भरगच्च कार्यक्रम आयोजित केला आहे. याचा लाभ रसिकांनी घ्यावा असे आवाहन योगेश सुतार, आकाश शिंदे, समीर देशमुख, कैलास सातांबेकर, शार्दुल्य देशमुख, श्रेयस रोडे व रघुनाथ सातांबेकर यांनी केले आहे.