| आगरदांडा । प्रतिनिधी ।
श्री ओम साई आदिवासी बहुउद्देशिय सेवाभावी संस्था, मेंगाळवाडी संगमनेरतर्फे दि.26 ते 1 जानेवारी या सप्ताहात जिल्हयात भव्य मोटार सायकल दिंडी सोहळा आयोजित केला असुन सुमारे 150 आदिवासी युवक सहभागी झाले आहेत. या दिंडीचे प्रस्थान सोमवार (दि.26) श्री वाघोबा मंदिर, वाघोबावाडी, मेंगाळवाडी- संगमनेर येथून झाले असून श्रीक्षेत्र कचेश्वर, बोटा श्री संत ज्ञानेश्वर महाराज रेडा समाधी आळे -एकविरा आई -लोणावळा श्रीक्षेत्र खोपोली गगनगिरी महाराज मठ- श्रीक्षेत्र महड गणपती मंदिर- मुरुड जंजिरा अलिबाग समुद्र किनारा व किल्ला दर्शन श्रीक्षेत्र शिर्डी साईबाबा श्रीक्षेत्र निझर्णेश्वर श्री क्षेत्र बिरोबा विरभद्र महाराज या धार्मिक स्थळांना भेट देणार आहेत.