| खोपोली । प्रतिनिधी ।
खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या पूर्व प्राथमिक शाळेचा वार्षिक पारितोषीक वितरण सोहळा बुधवारी पार पडला. यावेळी जनता पूर्व प्राथमिक शाळा शालेय समितीचे अध्यक्ष चंद्रकांत केदारी पूर्व प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका समीक्षा ढोके, प्रशांत गोपाळे, राजेश अभणी, भास्कर लांडगे, अनंता हडप, राजेंद्र म्हात्रे, भाई ओव्हाळ, रवींद्र मोरे, दिशा राणे, संदीप ओव्हाळ, समाधान दिसले, राज साळुंके ,संतोषी म्हात्रे ,सारिका सावंत यासह सहकारी शिक्षक तसेच विद्यार्थी व पालक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. आभार वासंती घोडविंदे तर सूत्रसंचालन राजेंद्र म्हात्रे यांनी केले