मोटारसायकली चोरणारी टोळी जेरबंद

खोपोली पोलिसांनी कामगिरी

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |

खोपोली शहर आणि परिसरातून मोटारसायकली चोरणार्‍या टोळीला पकडण्यात पोलिसांना यश आले आहेत. या प्रकरणी दोघाजणांना कुर्ला येथे अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून चोरीस गेलेल्या दीड लाख रुपये किंमतीच्या मोटारसायकली जप्तही करण्यात आल्या आहेत.

वरची खोपोली व काटरंग परिसरातून 22 डिसेंबर रोजी मोटारसायकल चोरी झाल्याचे दोन वेगवेगळे गुन्हे खोपोली पोलीस ठाणे येथे दाखल झाले होते. गुन्हयाचा तपासकरीत असताना घडलेल्या घटनेच्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तसेच शेडुंग टोलनाका येथील फुटेज दत्ता नुलके, कादर तांबोळी यांनी संकलीत करून आरोपीत याने गुन्हयामध्ये वापरलेले चारचाकी वाहनाचा नंबर प्राप्त केला व त्यावरून आरोपी व त्याचे साथीदार यांचा शोध घेण्यासाठी मुंबई परिसरात रवाना झाले. तपास पथकाला मिळालेल्या माहितीनुसार आरोपी हे कुर्ला चुनाभट्टी भागातील कुरेशीनगर येथील असल्याची माहिती मिळाली. तपास पथकाने सदर ठिकाणी जावुन चोरीस गेलेली दोन मोटार सायकल, चोरी करताना वापरण्यात आलेल चारचाकी वाहन क्र.एमएच-02-एव्ही-3303, तसेच तीन आरोपी यांना अटक करण्यात आली आहे. अटक आरोपी याने काटरंग व वरची खोपोली परीसरातुन चोरीस गेलेल्या दोन्ही मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली आहे.

चोरीस गेलेल्या दोन्ही मोटार सायकल चुनाभट्टी कुर्ला येथून आरोपींकडून जप्त करण्यात आल्या आहेत. आरोपी यांच्यावर यापूर्वी 3 ते 4 गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे. सदर गुन्हयाचा तपास पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांचे मार्गदर्शनाखाली, गायकवाड, हंबीर हे तपास करीत आहेत. तर सहा. पोलीस निरीक्षक राकेश कदम, तपास पथकाचे प्रसाद पाटील, दत्ता नुलके, कादर तांबोळी यांचे प्रयत्नातुन सदरचे गुन्हे उघडकीस आलेले आहेत.

Exit mobile version