। पनवेल । प्रतिनिधी ।
पनवेल रेल्वे स्थानकाचे बाहेर रेल्वेमेंन्टनेन्स डेपोच्या जवळ मोकळ्या जागेत पार्क करून ठेवलेली रॉयल इनफिल्ड कंपनीची बुलेट अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली आहे. साईनगर येथील प्रणव पवार यांनी त्यांची एक लाख रुपये किमतीची रॉयल इनफिल्ड कंपनीची बुलेट मोटारसायकल पनवेल रेल्वे स्थानकाचे बाहेर रेल्वेमेंन्टनेन्स डेपोच्या जवळ मोकळ्या जागेत पार्क करून ठेवली असता अज्ञात चोरट्याने ती मोटारसायकल चोरून नेली. याबाबत प्रणव पवार यांनी पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
मोटारसायकलची चोरी
