पनवेलमध्ये मोटारसायकलीची चोरी

। पनवेल । वार्ताहर ।
राहत्या घरासमोरील पार्कींगमध्ये उभी करून ठेवलेली मोटारसायकल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना अष्टविनायक बिल्डींग नावडे फेज येथे घडली आहे. अजयसिंग ठाकूर यांनी त्यांची 55 हजारांची बजाज पल्सर कंपनीची काळ्या रंगाची एमएच 46 बीएक्स 3133 हि अष्टविनायक बिल्डींग नावडा फेज येथे बिल्डींगच्या पार्कींगमध्ये उभी केली असता अज्ञात चोरट्यांनी सदर मोटारसायकल चोरून नेल्याने याबाबतची तक्रार तळोजा पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

Exit mobile version